Saturday, May 18, 2024
Home अपघात पातुर येथे भिषण अपघातात 6 ठार तर 3 गंभीर ! सरनाईक व...

पातुर येथे भिषण अपघातात 6 ठार तर 3 गंभीर ! सरनाईक व ठाकरे कुटुंबांवर दुःखांचा डोंगर कोसळला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला-वाशीम राज्य मार्गावर पातूर येथील उड्डाणपुलाजवळ आज दुपारी दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.अपघातातील गंभीर जखमी झालेल्या ३ जणांवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली. अपघातात एवढा भिषण होता की, दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

वाशिम कडून येत असलेली गाडी क्रमांक एम. एच. ३७ वी ५११ ही गाडी पातूर मार्गाने उड्डाणपुला जवळून अकोल्याकडे जात होती तर पातुर तालुक्यातील आस्टूल येथील रहिवासी ठाकरे यांची एम. एच. ३० बीएल ९५५२ कार वाशिमकडे जात होती. या मार्गावर काम सुरू असल्याने, वळण मार्ग दिल्याने दोन्ही कार एकाच रस्त्यावर भरधाव धावत असताना अचानक आमनेसामने आल्या आणि लक्षात येण्यापूर्वीच एकमेकांना जोरदार धडक दिल्याने भिषण अपघात होवून ४ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमींना रुग्णालयात नेत असताना दोघांचा वाटेवर मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक व सहकारी घटनास्थळी पोहोचले. या अपघातात रघुवीर अरुणराव सरनाईक वाशिम, शिवानी अजिंक्य आमले नागपूर, अस्मिता अजिंक्य आमले नागपूर व आस्टूल रहिवासी अमोल शंकर ठाकरे, सुमेध इंगळे आणि सिद्धार्थ यशवंत इंगळे ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर गंभीर जखमी पियुष देशमुख, सपना देशमुख व श्रेयस सिद्धार्थ इंगळे यांना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेमध्ये वाशीम शहरातील शिवाजी शिक्षण संस्थेचे अरूणराव सरनाईक यांचे कुटुंब असल्याची माहिती आहे.अपघाताची भीषणता पाहता अंगावर काटा उभा राहतो.

RELATED ARTICLES

अकोल्यात मन सुन्न करणारी घटना ! 7 वर्षाच्या मुलीचा कुलरमधिल विजेचा धक्का लागून मृत्यू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शिवसेना वसाहत परिसरातील रहीवासी माजी नगरसेवक अमाेल गाेगे यांची ७ वर्षीय मुलगी युक्ती घरात लावलेल्या कुलरजवळ...

जळगाव एमआयडीसीत आग्नितांडव !अनेक कर्मचारी जखमी : मोरया केमिकल कंपनीतील घटना

येथील एमआयडीसी मोरया ग्लोबल कंपनीसह  केमिकलच्या दोन कंपन्या बुधवारी सकाळी ८ वाजता सुमारास आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यावेळी कंपनीतून विविध प्रकारचे स्फ़ोट होत...

नागपुरात रात्रीला कंटेनरचा थरार ! अनेकजण जखमी व काहींना गंभीर दुखापत : गाड्यांचा चेंदामेंदा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : नागपूर शहरातील मानकापूर चौकात रविवारी रात्री बेदरकार कंटेनरने सिग्नलवर उभ्या असलेल्या डझनाहून अधिक कार-दुचाकींना धडक दिली. ही...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!