Saturday, May 18, 2024
Home सामाजिक विमलकुमार गोयनका यांच निधन : उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता अंतिमयात्रा

विमलकुमार गोयनका यांच निधन : उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता अंतिमयात्रा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पश्चिम विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात ख्यातनाम श्री नथमल गोयनका लॉ कॉलेज अकोला आणि कारंजा येथील श्री.किसनलाल नथमल गोयनका कला आणि वाणिज्य महाविद्यालय या शिक्षण संकुलाचे दानदाता गोयनका कुटुंबातील सदस्य तसेच शहरातील विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे आधारस्तंभ आणि प्रतिष्ठित कापूस व लॉजिस्टिक्स व्यवसायीक विमलकुमार नथमल गोयनका यांचे आज शुक्रवार ३ मे रोजी मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६८ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अनिरुद्ध, एक मुलगी, भाऊ विनयकुमार (मधुबाबू), विनोदकुमार तसेच नात नातवंडांसह मोठे आप्त परिवार आहे.

कापसाच्या व्यवसायामुळे देशभरात नावलौकिक असलेले विमल कुमार गोयनका हे मागील काही वर्षांपासून कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होते. मात्र स्वतःच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर शेवटपर्यंत सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी होऊन कार्यरत होते. सावरगाव येथे १जानेवारी २०२३ रोजी पार पडलेल्या गोशाळा कार्यक्रमात ते जातीने उपस्थित होते. व्यवसायासोबतच शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात हिरीरीने सहभाग घेणारे विमलबाबू यांनी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य आणि वरिष्ठ उपाध्यक्षपदावर कार्य करीत २०११ ते २०१४ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी बीजीई सोसायटीचे मानद सचिवपद विभुषीत केले.

आदर्श गो सेवा एवं अनुसंधान प्रकल्पाचे संचालक होते. तर अकोला अर्बन बँकेचे संचालक म्हणून काम केले. विमल कुमार गोयनका यांच्या पुढाकाराने अकोला येथे पहिल्यांदा गीता मैत्री मिलन सारख्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पार पडले. यानिमित्ताने संपर्कात आलेले संजय मालपाणी यांच्या सोबत त्यांचे दृढ संबंध झाले. अकोल्यात केवळ ‘गीता परिवार’ चा कार्यक्रम आयोजित करण्याचा त्यांचा मानस होता. पण त्यापुर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि गीता परिवाराचा प्रचारक हिरावून घेतला, असं कल्पना भुतडा यांनी सांगितले.

आपल्या हसतमुख आणि मनमिळावू स्वभावामुळे सर्वांना प्रेरणादायी व परिचीत असलेले गोयनका अनेक संस्थांना सढळ हाताने आर्थिक मदत करण्यास सदैव तत्पर राहत होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.अकोला अग्रवाल समिती, बीजीई सोसायटी, गीता परिवार आणि विविध संस्थांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
त्याची अंत्ययात्रा उद्या शनिवार ४ मे रोजी जठारपेठ येथील ‘रिध्दी सिध्दी’ निवासस्थानाहुन सकाळी ९ वाजता मोहता मिल मोक्षधामसाठी निघणार आहे.अकोला दिव्य परिवाराचे ते कौटुंबिक सदस्य होते.

RELATED ARTICLES

प्रदीप नंद यांचा राष्ट्रीय प्रतिभा सन्मान पुरस्कार देऊन गौरव ! जगातील एकमेव गणपती मुर्ती संग्रहालयाची उत्तुंग भरारी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशासह विदेशातील कलाप्रेमी आणि गणेश भक्तांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेले चिखलदरा येथील नंद गणपती संग्रहालयचे संस्थापक संचालक प्रदीप...

अकोला माहेश्वरी समाजातील ख्यातनाम व्यावसायीक अशोक भुतडा यांचे निधन: आज सायंकाळी अंत्य संस्कार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरातील कॅटर्रस व्यवसायीक व माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व अशोक बालकिसन भुतडा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले....

सत्तेपुढे शहाणपण….. घटकोपरमधील चेंगराचेंगरीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुंबईत गेल्या काही वर्षांत मेट्रो १ चे प्रवासी वाढले आहेत. सेंट्रल रेल्वे स्थानकातून पश्चिम उपनगरात जाण्याकरता मेट्रो...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!