Sunday, June 16, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SIT...

मोठी बातमी : लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अडकलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएसचे नेते एचडी रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अटक केली आहे. एका पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत जेडीएससह मित्रपक्ष असलेल्या भाजपचीही मोठी अडचण झाली आहे.

मैसूर येथील एका महिलेच्या अपहरणाची तक्रार मागील गुरुवारी दाखल करण्यात आली होती. सदर महिला लैंगिक शोषण प्रकरणातील पीडिता असल्याचं बोललं जात आहे. “माझी आई मागील सहा वर्षांपासून एचडी रेवन्ना यांच्या घरी आणि फार्महाऊसवर काम करत होती. मात्र तीन वर्षांपूर्वी ती हे काम सोडून आपल्या गावात मजुरीचं काम करू लागल्या.  काही दिवसांपूर्वी त्यांचा परिचीत असलेला  सतीश नावाचा व्यक्ती आला आणि माझ्या आईला घेऊन गेला. काही दिवसांनंतर त्याने आईला घरी आणून सोडलं. त्यानंतर २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सतीश हा पुन्हा आमच्या घरी आला. रेवन्नाने तुला आणायला सांगितलं आहे, असं सांगून तो पुन्हा माझ्या आईला घेऊन गेला. त्यानंतर १ मे रोजी सतीशचा एक मित्र आमच्या घरी आला आणि त्याने सांगितलं की तुमच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुझ्या आईचं लैंगिक शोषण केलं जात असल्याचं त्याने मला सांगितलं,” असं या महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं.

दरम्यान, याप्रकरणी आता कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने एचडी रेवन्ना यांना अटक केली असून अधिक तपास केला जात आहे

राहुल गांधींनी केलं PM मोदींना लक्ष्य

कर्नाटकातील लैंगिक शोषण प्रकरणावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. “प्रज्वल रेवण्णा प्रकरणामुळे पंतप्रधान आता कर्नाटकमध्ये यायला घाबरत आहेत, त्यांनी सर्व जाहीर सभा रद्द केल्या आहेत. कर्नाटकात येऊन रेवण्णाबद्दल देशाला सांगा. प्रज्वल रेवण्णा प्रकरण भाजप नेत्यांना माहीत होते आणि देशाबाहेर पळून जाण्यात रेवण्णा यांना मदत करण्यात आली,” असा आरोप राहुल गांधी यांनी नुकताच एका जाहीर सभेतून केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!