Saturday, May 18, 2024
Home अर्थविषयक 'महाबँक'ला 1 हजार 218 कोटींचा निव्वळ नफा ! एकूण व्यवसाय 4 लाख...

‘महाबँक’ला 1 हजार 218 कोटींचा निव्वळ नफा ! एकूण व्यवसाय 4 लाख 74 हजार कोटी रुपयांवर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील मार्च तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रने १,२१८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीतील ८४० कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ४५ टक्के वाढ झाली आहे.

या आर्थिक वर्षअखेर बँकेचा व्यवसाय जवळपास १६ टक्क्यांनी वाढून चार लाख ७४ हजार कोटी रुपयांवर गेला. दिनांक 26/04/2024 रोजी बँकेचे आर्थिक निकाल जाहीर करण्यात आले. त्यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधु सक्सेना यांनी ही माहिती दिली. बँकेचे कार्यकारी संचालक आशीष पांडे, रोहित ऋषी व महाव्यवस्थापक आणि मुख्य फायनान्शिअल अधिकारी व्ही.पी. श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.

बँकेने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४,०५५ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला असून, मागील वर्षाच्या तुलनेत नफ्यात ५५ टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेला २,६०२ कोटी रुपये नफा झाला होता. वर्षभरात व्याज उत्पन्न ७,७४१ कोटींवरून ९,८२२ कोटी रुपयांवर गेले आहे. मार्च तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याजउत्पन्नही २,५८४ कोटी रुपये झाले असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात १८.१७ टक्के वाढ झाली आहे.

बँकेचा एकूण व्यवसाय चार लाख ७४ हजार ४११ कोटींवर गेला असून, त्यात वार्षिक १५.९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ठेवींचे प्रमाण १५.६६ टक्क्यांनी वाढून त्या दोन लाख ७० हजार ७४७ कोटींवर गेल्या आहेत, कर्ज व्यवसाय १६.३० टक्क्यांनी वाढून दोन लाख तीन हजार ६६४ कोटी रुपयांवर गेला आहे. रिटेल, शेती, सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग क्षेत्राशी निगडित व्यवसायात वार्षिक २६.६९ टक्के वाढ झाली.

रिटेल कर्ज व्यवसाय ५१ हजार कोटींवर, तर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राशी निगडित कर्ज व्यवसाय ४२ हजार ११७ कोटींवर गेला. बँकेला थकीत कर्जांचे प्रमाण कमी करण्यात यश आले असून, ३१ मार्च २०२४ रोजी निव्वळ एनपीएचे प्रमाण ०.२० टक्क्यांपर्यंत घटले आहे. एकूण एनपीएचे प्रमाण मार्च २०२३ मधील २.४७ टक्क्यांवरून १.८८ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.अशी माहिती बँक ऑफ महाराष्ट्रच्या जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

अकोला M.I.D.C येथील मिडास ब्रॅण्डचे उत्पादक अनिल इंडस्ट्रीजवर इन्कमटॅक्सचा छापा ! मिडास ब्रॅण्डने डाळीचे उत्पादन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मध्य प्रदेश येथील कटनी येथील प्रख्यात अनिल इंडस्ट्रीज या उद्योग समुहाच्या अकोला औद्योगिक वसाहतीमधिल डाळ मिलवर जबलपूर...

डाॅ. लोखंडे यांचे आवाहन ! अवैध सावकारी निर्मुलनासाठी सहकारी पतसंस्था चळवळ महत्वाची : जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे प्रशिक्षण

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतकरी आत्महत्याग्रस्त अकोला जिल्ह्यातील अवैध सावकारी निर्मुलनासाठी अधिकाधिक सहकारी पतसंस्थाची नोंदणी करणे आवश्यक आहे.यासाठी जिल्ह्यात सहकारी पतसंस्था...

हिरे व्यापाऱ्यांची पाठ ! जगातील सगळ्यात मोठा ‘सूरत डायमंड बोर्स’ झाला भूत बंगला : अनेकजण पुन्हा मुंबईत

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अवघ्या काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेल्या गुजरातमधील सूरत डायमंड बोर्सला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने जगातल्या या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!