Saturday, May 18, 2024
Home संपादकिय पहिल्यांदा मोदी 'बॅकफुट' वर ! प्रचारातील 'नॅरेटिव्ह' मोदींनाच प्रतिकुल जाऊ लागले ?...

पहिल्यांदा मोदी ‘बॅकफुट’ वर ! प्रचारातील ‘नॅरेटिव्ह’ मोदींनाच प्रतिकुल जाऊ लागले ? जाहीरातीत बाळासाहेब ठाकरे

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : सलग दोन लोकसभा निवडणुकीत भाजपला ‘विश्वसनीय’ विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार 400 पार’ चा नारा देत तिसऱ्या लोकसभा निवडणूकीचा प्रारंभ तर केला. परंतु 2024 च्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार फेरीच्या पुर्वीच नरेंद्र मोदी ‘बॅकफुट’ वर आले. पहिल्याच फेरीत ‘अब की बार 400 पार’ बाजूला ठेवून प्रचार करताना दमछाक झाली. दोन टप्प्यातील प्रचारातील ‘नॅरेटिव्ह’ मोदींनाच प्रतिकुल जाऊ लागल्यानेच, आज महाराष्ट्रातील वर्तमान पत्रात छापून आलेल्या जाहीरातीत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला आहे.आणि हे न समजण्या एवढे मतदार दुधाखुळे निश्चितच नाहीत.

20140श नंतर पहिल्यांदा निवडणूक ‘नॅरेटिव्ह’ त्यांच्या प्रतिकुल गेल्याचे दिसू लागले. येत्या २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान असून आज जाहीरातीत मोदींच्या फोटोच्या वरच शिवसेनेचे संस्थापक, हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, बरेच काही सांगून जाते. का आणि कशा साठी हा फोटो वापरला ? या मुद्द्यावर भाजप व समर्थक ठेवणीतले उत्तर देणारचं पण मोदींचा करिश्मा ओसरत आहे. जर नाही तर, अटलजींचा फोटो वर्जित करणारी व्यक्तीने ,आपल्या डोक्यावर ठाकरेंचा फोटो लावण्याचं काम नाही.हा येथे मुद्दा नाही.असो !

मागील १० वर्षात मोदींनी कधीच या गोष्टीची कधीही दखल घेतली नाही की, विरोधी पक्षनेते त्यांच्या बद्दल काय बोलत आहेत. मोदी नेहमी आपला अजेंडा बनवून, विरोधकांना त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी ‘मजबूर’ करत. पण यावेळी विरोधकांच्या ‘संविधान बदलणार’ या मुद्द्यावर मागील आठवड्याभरात अनेकदा मोदी आणि शाह यांना प्रत्येक सभेत स्पष्टीकरण द्यावे लागले. एवढेच नव्हे तर गृहमंत्री अमित शाह यांनी एका टिव्ही आणि वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा मुद्दा खोडून काढला. राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत, तथ्यहीन आरोप करीत आहे. याविरोधात निवडणूक आयोगाकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. असंही भाजप नेते सांगत आहेत. मात्र अप्रत्यक्षपणे संविधान बदलणार या मुद्द्यावर बचावात्मक पवित्रा घेण्यास मोदी-शाह मजबुर आहेत.

आता सात टप्प्यातील प्रचाराचे दोन टप्पे आज संपले आहे. मात्र कमी झालेल्या मतदानातील विविध कारणांसह मतदारांचा ‘निरुत्साह’ ने भाजपसाठी कळीचा प्रश्न निर्माण केलेला असताना, जसा जसा प्रचार चुरसीचा होत जाईल, तसं तसा ‘संविधान बदलणार’ प्रचारात शिगेला पोहोचेला असेल. भाजपकडून यंदा’400 पार’ केवळ देशाची ‘घटनाबदल’ साठीच, हे मतदारांच्या मनात खोलवर रुजविण्यात इंडिया आघाडी आणि इतर विरोधी पक्ष सध्या तरी यशस्वी झाले आहेत. या मुद्द्यावर देशातील साहित्यिक, लेखक, प्रबोधनकार, चवळीतील कार्यकर्ते, पत्रकार, अर्थतज्ज्ञ, विविध समाजातील विविध संस्था, संघटना, पुरोगामी विचारसरणीचे साहित्यिक आंबेडकरी विचारवंत, दलित चळवळीला चालना देणारे समाजधुरणी यांच्यासोबत लोकशाहीचे पुरस्कर्ते एकजुट झाले आहेत. ही एकजुट हळूहळू आंदोलनात्मक स्वरूपात पुढे येईल, असे आश्वासक चित्र दिसत आहे.

प्रचाराच्या तिसऱ्या फेरीत मोदी कोणता ‘नॅरेटिव्ह’ तयार करणार, हे दिसून येईलच.पण इंडिया आघाडीसह इतर विरोधी पक्षांकडून संविधान बदलणार आणि आर्थिक विषमता, हे दोन मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी ठेवूनच पुढे जाणार असल्याचे स्पष्ट दिसते. यात दुमत नाही की, उत्तर भारतात या मुद्द्यावर आंबेडकरी जनता, दलित व आदिवासी मतदारांमध्ये विचार प्रवाह निर्माण होत आहे. मोदी आणि भाजप नेतृत्वाने कितीही सांगितले तरी मतदार या मुद्द्यावर आश्वस्त होईल, यात शंका आहे. विविध माध्यमांतून येत असलेल्या माहितीने हा मुद्दा भाजपची चिंता वाढविणारा आहे. या अनुषंगाने इंडिया आघाडीच्या मतांचा टक्का वाढणार तर भाजप एनडीएचा मतांचा टक्का घसरणार, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दोन टप्प्यात शहजादा, मुसलमान, कॉंग्रेस या भोवताली मोदींनी बॅटिंग लाईनअप ठेवली.तर अमित शाह यांनी राम मंदिर. ३७० कलम, तीन तलाक आणि कॉंग्रेस या मुद्द्यावर भर देत असले तरी, येत्या काळात विरोधकांच्या पिचवर मोदींना बॅटिंग करावी लागली तर ? तर मोदी की गारंटी तसेच 2047 पर्यंत विकसीत भारत आणि मोदी को वोट देने के लिये,,,,,,,! सारखे आश्वासन, वाढत्या तापमानात विरघळून जाईल. विविध सर्व्हेत मोदी भारी अंतराने विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आले. पण दुसऱ्या टप्प्यात पुन्हा भाजपचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात जर मतांचा टक्का घसरला तर, तर अवघड जागेवरच दुःखणं होईल.

एकमात्र खरं की, 2024 ची निवडणूक जाहीर होताच, निकाल लागलेलाच आहे, असं सर्वत्र चित्र पसरलं होतं. आजही हेच चित्र रंगविले जात असताना, दरवर्षी २ कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, काळेधन, बहुत हुई महागाई की मार,असे एक ना अनेक मुद्द्यांवर मोदींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने, “संविधान बदलणार” वर मोदींनी कितीही सांगितले तरी, त्यावर विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न उभा राहतो आणि यावर मोदी बॅकफूटवर आहेतः तृतास एवढेच

RELATED ARTICLES

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

खरं काय अन् खोटं का ? मुस्लिम लोकसंख्येला राजकीय गंध ! ‘या’ दोन गोष्टींचा बागुलबुवा केला की…

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : ग्रामपंचायतीपासून तर लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रचार काळात प्रतिस्पर्ध्यांवर वार-पलटवार करणे, उणे दुणे काढून एकमेकांना टोले...

भाजप बहुमतपासून दूर ? मोदींचा टप्प्यागणिक भरकटलेला प्रचार आणि चार टप्प्यासाठी केजरीवालही मैदानात

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोकसभेची निवडणूक आता उत्तरेकडे सरकू लागली असून टप्प्यागणिक भाजपच्या प्रचाराची दिशा बदलत आहे. प्रचाराच्या शुभारंभाचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!