Sunday, May 5, 2024
Home राजकारण भाजपच्या बिनविरोध सीटवर मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार बेपत्ताच; निवडणूक आयोग गंभीर

भाजपच्या बिनविरोध सीटवर मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार बेपत्ताच; निवडणूक आयोग गंभीर

गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघात बिनविरोध लढत झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला तर अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचा उमेदवार जिंकला आहे. परंतु यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आपला आला आहे. काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असून तो सापडत नसल्याने या बिनविरोध प्रकरणाविरोधात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कुंभाणी यांचा अर्ज रद्द झाल्याने काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सावरू शकलेले नाहीत. तर आपने कुंभाणी यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. आपने सुरतच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करत या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुरतचे जिल्हाधिकारी सौरभ पारघी यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाने वातावरण तापविताच मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती यांनी याचा अहवाल मागविला आहे. यानुसार पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. 

निलेश कुंभाणी यांच्याविरोधात जिल्हाधिकारी अहवाल देणार आहेत. यानंतर सुमोटो लावायचा की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकरणाची गंभीरता पाहून सु मोटो देखील घेतला जाऊ शकतो.अनेक प्रकरणांत आम्ही अशी कारवाई केली आहे, असे भारती यांनी म्हटले. 

या प्रकरणावर आता पोलीस अधिकारी शमशेर सिंग यांचे वक्तव्य आले आहे. ज्यांनी सुरक्षा मागितली त्यांना दिली. बसपाच्या उमेदवारानेही मागितली होती. परंतु ते घरी सापडले नाहीत. पोलिसांवर लावले जात असलेले आरोप चुकीचे आहेत. क्राइम ब्रांच कुठेही गेलेली नाही. आमच्याकडे तक्रार आल्यावर त्यावर कारवाई करणार, असे ते म्हणाले आहेत. कुंभाणी काही पहिल्यांदाच निवडणूक लढवत नव्हते.

यापूर्वी त्यांनी चार वेळा निवडणूक लढविली आहे. यामध्ये महापालिका, विधानसभा अशा या निवडणुका आहेत. तिकीट मिळाल्यावर कुंभाणी यांनी सर्व ताकदीने प्रचार सुरु केला होता. कुंभाणी यांच्या उमेदवारी अर्जावर एका प्रस्तावका सही चुकीची असल्याची तक्रार भाजपाने केली होती. यावरून या प्रस्तावकांना बोलविण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु ते बेपत्ता होते. यानंतर कुंभाणी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. आता ते देखील बेपत्ता झाले असून त्यांच्या घरी कुलुप लावलेले आहे. तर गद्दार असे पोस्टर चिकटविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

मोठी बातमी : लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अडकलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएसचे नेते एचडी रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास...

भाजपची चिंता वाढली ! मतदान वाढीसाठी नवा गेमप्लान ; आता प्रचारात ‘हिंदू मुस्लिम’ तृष्टीकरणाचा डाव

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात देशपातळीवर 2019 च्या तुलनेत तब्बल 3.11 टक्के कमी मतदान झाल्यानंतर, 'विकसनशील...

रडीचा डाव! डॉ.अभय पाटलांच्या संदर्भात न्युज चॅनलच्या स्क्रीन शॉटवर खोटी बातमी केली व्हायरल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अभय काशिनाथ पाटील यांचा विजय दृष्टीक्षेपात दिसत असल्याने की...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

अकोल्यातील आरोपी डॉक्टरासोबत सिव्हील लाईन पोलिसांचं साटेलोटे ? गुन्हा दाखल करण्यास 4 दिवस का ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : चेहऱ्यावरील आजारांसाठी आलेल्या महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग केल्याप्रकरणाची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला सिव्हिल लाइन्स पोलिस...

अँड उज्ज्वल निकमांनी करकरेंना लागलेल्या गोळीचे सत्य न्यायालयापासून लपवलं ! वडेट्टीवार यांच विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती आणि आताचे भाजपाचे उत्तर मध्य मुंबईतील...

राष्ट्रीय पातळीवर श्री समर्थ कोचिंग क्लासेसचा नावलौकिक !जेईई मेन परिक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पश्चिम विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या मुलभूतरित्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर व ख्यातनाम अकोल्यातील श्री समर्थ कोचिंग क्लासेसच्या...

अकोल्यातील अल्पवयीन मुलीची धर्मांतरानंतर एक लाखांत राजस्थानात विक्री; आईसह टोळी जेरबंद

Akola crime:अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला येथील एका अल्पवयीन मुलीची धर्मांतर करून तिचा राजस्थानातील तरुणाशी यवतमाळात विवाह लावून देत एक लाख...

Recent Comments