Saturday, May 18, 2024
Home राष्ट्रीय खरा सवाल ! रामललाच्या जुन्या स्वयंभू मूर्तीचे काय होणार? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद...

खरा सवाल ! रामललाच्या जुन्या स्वयंभू मूर्तीचे काय होणार? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे पत्र

अकोला दिव्य न्युज ब्युरो : श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख जवळ येत आहे. पण, देशातील चार शंकराचार्यांनी या सोहळ्याला विरोध दर्शवला आहे. यातच आता ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्यापूर्वी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी श्रीरामाच्या जुन्या मूर्तीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास महाराज यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, काल बातम्यांमधून माहिती मिळाली की, रामललाची मूर्ती एका ट्रकमध्ये भरुन अर्धवट तयार झालेल्या मंदिरात आणली आहे. या मूर्तीची नव्याने बांधलेल्या श्री राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाईल. पण, श्रीरामलला विराजमान(जुनी मूर्ती) आधीपासून मंदिरात आहे. आता प्रश्न पडतो की, नवीन मूर्ती बसवली तर जुन्या मूर्तीचे काय होणार?

 ते पुढे म्हणतात की, हे नवे मंदिर श्री रामलला विराजमानासाठी बांधले जात आहे, असा समज राम भक्तांमध्ये होता. पण आता या मंदिराच्या गाभार्‍यात नवीन मूर्ती आणली गेली आहे. लक्षात ठेवा, हे तेच रामलला विराजमान आहेत, जे श्रीराम जन्मभूमितून प्रकट झाले आहेत. मुस्लिम चौकीदारानेही याची साक्ष दिली आहे. ज्यांनी अनेक प्रसंगांना धैर्याने सामोरे गेले, ज्यांनी वर्षानुवर्षे तंबूत राहून ऊन, पाऊस, थंडी सहन केली, ज्यांनी कोर्टात केस लढवली आणि जिंकली. यासाठी भितीनरेश राजा महताब सिंह, राणी जयराजराजकुंवर, पुजारी पंडित देविदिन पांडे, हंसवरचे राजा रणविजय सिंह, असंख्य संतांनी आणि रामभक्तांनी बलिदान दिले आहे.

ज्या ठिकाणी स्वयंभू मूर्ती सापडते, ती इतर ठिकाणी स्थापित केली जाऊ शकत नाही. हे प्रकरण कोर्टात असतानाही वकिलांनी हाच मुद्दा मांडला होता. आता आमची विनंती आहे की, मंदिराच्या गर्भगृहात रामलला विराजमान, म्हणजेच जुनी मूर्ती स्थापित करावी. अन्यथा हे कार्य इतिहास, लोकभावना, धर्मशास्त्र आणि नैतिकतेच्या विरोधात असेल. असे न केल्यास रामलला विराजमानवर खुप मोठा अन्याय होईल. आम्ही आशा करतो की, आमचे म्हणने तुमच्यापर्यंत पोहचले असेल आणि तुम्ही यावर विचार कराल, असं अविमुक्तेश्वरानंद यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

अर्थसंकल्पातून ‘चाहूल’ ! देश एका मोठ्या संकटाकडे : एक उच्चाधिकार समिती स्थापन होईल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये काही खास घोषणा नसल्या तरी अर्थमंत्र्यांनी केलेली एक घोषणा आश्चर्यकारक वाटणारी आहे. लोकसंख्या...

अकोला इंडस्ट्रीज असोसीएशनतर्फे अमृत महोत्सवी गणतंत्र दिवस साजरा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : व्यवसाय आणि उद्योगात जरी विविधता असली तरी आमच्या एकजुटीताने अकोला औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी सहकार्यानेच अकोला जिल्हा विकासाकडे...

अकोल्यातील दोन्ही ऑक्सिजन प्लॅंट देखील बंदच ! कोट्यावधी रुपये पाण्यात : स्पेशल ऑडिट करा

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : करोनाकाळात अकोल्यात लावण्यात आलेले पीएसए तंत्रज्ञानावर दोन्ही ऑक्सिजन प्लॅंट मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने, ऑक्सिजन...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!