Saturday, May 18, 2024
Home महाराष्ट्र भाजप नेत्यांचा भपकेबाजपणा ! महागड्या गाड्या, घड्याळे वापरू नका -नड्डा यांचा सल्ला

भाजप नेत्यांचा भपकेबाजपणा ! महागड्या गाड्या, घड्याळे वापरू नका -नड्डा यांचा सल्ला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भाजपचे नेते, पदाधिकारी आणि आमदार-खासदारांनी निवडणूक प्रचार काळात जनसामान्यांमध्ये मिसळताना आणि झोपडपट्ट्यांमध्ये फिरताना महागड्या गाड्या व राडोसारखी महागडी घड्याळे आदी न वापरता साधी राहणी ठेवण्याच्या सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षाच्या मुंबईतील नेते व पदाधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईत महायुतीच्या सहाही उमेदवारांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नड्डा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक घेतली. त्यास व्यवस्थापन समितीत असलेल्या वेगवेगळ्या ३६ विभागाचे प्रमुख, भाजपचे सर्व आमदार व खासदार उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनातच सर्व पदाधिकारी व नेत्यांना साधी राहणीमान ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. विरोधकांनी केलेले आरोप लगेच खोडून काढून त्यांना प्रत्युत्तर देण्यात यावे.

केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि केलेली कामे जनतेपर्यंत प्रभावी पद्धतीने पोचविण्यात यावीत. नवीन मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली असून त्यांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी भेटी घेऊन प्रयत्न करावेत, अशा सूचना नड्डा यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर स्थानिक जनतेचे प्रश्न व महत्वाचे मुद्दे नेत्यांनी सरकारपुढे उपस्थित करावेत आणि जे प्रश्न सोडवायचे राहिले असतील, तेही मार्गी लावावेत, अशा सूचना नड्डा यांनी केल्या.

निवडणूक प्रचार तयारी, दौऱ्यांची आखणी, समाजमाध्यमांचा प्रभावी वापरासह अन्य मुद्द्यांवर नड्डा यांनी दोन स्वतंत्र बैठकांमध्ये तयारीचा आढावा घेतला. त्यास उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर ! 10 जुनला मतदान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : येत्या ७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार...

मोदींना आता ‘त्या’ घोटाळेबाजांचा प्रचार करावा लागणार? किरीट सोमय्या तोंडघशी पडले !

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुंबईतील सहा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील प्रचाराला वेग...

वाचा संपूर्ण यादी ! ठाकरेंच्या शिवसेनेचे २१ उमेदवार जाहीर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. शिवसेना,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!