Saturday, May 18, 2024
Home ताज्या घडामोडी अकोला लोकसभा निवडणुकीत करड्याच्या बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क ! ज्येष्ठ व दिव्यांगांच्या...

अकोला लोकसभा निवडणुकीत करड्याच्या बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क ! ज्येष्ठ व दिव्यांगांच्या गृह मतदानाला प्रारंभ

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदार संघातील रिसोड तालुक्यातील करडा येथील बहिणाबाई बाजीराव देशमुख या आजीबाईंनी आज १३ एप्रिलला आपला मतदानाचा हक्क बजावला. दिव्यांग आणि 85 वर्षापुढील वयोगटात मतदान करुन त्या अकोला लोकसभा मतदारसंघात पहिल्या मतदार ठरल्या आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात 726 दिव्यांग व 85 वर्षापुढील 1 हजार 632 मतदार अशा एकूण 2 हजार 358 मतदारांना गृह मतदानाची सुविधा देण्यात आली असून त्याचा प्रारंभ आजपासून झाला.
रिसोड तालुक्यातील करडा येथील बहिणाबाई देशमुख यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि अकोला लोकसभा मतदारसंघातील गृह मतदानाची सुरूवात झाली. गृह मतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित करण्यात आले असून स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहे. ही मतदान पथके मतदाराच्या घरी पोहोचून त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या सुविधेमुळे दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
गृह मतदानाच्या तारखा निश्चित

गृह मतदानासाठी दिव्यांग व वृद्ध मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मतदान यंत्रणा घरी येण्याच्या तारखा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. या तारखांना घरी उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 13 व 15 एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दिनांक 18 एप्रिल असा आहे. अकोट विधानसभा मतदार संघ, तसेच अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 18 व 19 एप्रिल किंवा आवश्यकता वाटल्यास 22 एप्रिल असा आहे. बाळापूर मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 15 व 16 एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास 19 एप्रिल असा आहे.

अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 15 व 16 एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दिनांक 20 व 21 एप्रिल असा आहे. मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 18 व 19 एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दिनांक 20 व 21 एप्रिल असा आहे. सर्व संबंधीत दिव्यांग व 85 वर्षापुढील मतदारांनी नमूद दिनांकास घरी राहून निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

पंतप्रधान मोदी म्हणतात,आमच्या घरीही ईद साजरी व्हायची ! माझ्या घरी सर्व मुस्लिम कुटुंबातून जेवण यायचे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : माझ्या घराभोवती सर्व मुस्लिम कुटुंबे होती. आमच्या घरीही ईद साजरी व्हायची. इतर सणही साजरे केले जायचे. ईदच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!