Saturday, May 18, 2024
Home आंतरराष्ट्रीय Big News ! इराण व इस्राईलमध्ये युद्धाची ठिणगी ? इराणने जप्त केलेल्या...

Big News ! इराण व इस्राईलमध्ये युद्धाची ठिणगी ? इराणने जप्त केलेल्या जहाजावर १७ भारतीय

अकोला दिव्य न्युज ब्युरो : इराण आणि इस्रायल या दोन देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत असताना, इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने शनिवारी होर्मुझच्या समुद्रधुनीत इस्रायलशी संबंधित एक मालवाहू जहाज हवाई हल्ला करून ते जप्त केले. हे जहाज भारताकडे निघाले असून त्यावर १७ भारतीय नागरिक असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा इराणने जवळपास १०० ड्रोन आणि तेवढ्यातच मिसाईल इस्त्राईलच्या एका निश्चित भुभागावर सोडल्याचे वृत्त तेहरान येथील प्रसार माध्यमांनी दिले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलने सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासाच्या इमारतीवर हल्ला केला होता. त्यात रिव्होल्युशनरी गार्डच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह १२ जण ठार झाले होते. त्याचा बदला म्हणून इराणने ही कारवाई केली असल्याचे मानले जात आहे. इस्रायल गाझापट्टीत मागील ६ महिन्यांपासून हमासविरुद्ध युद्ध लढत आहे. जहाजावरील भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्रीय मंत्रालयाने संबंधित यंत्रणांशी बोलणी सुरु केली आहेत. 

हेलिकॉप्टरच्या साहाय्याने कमांडो जहाजावर उतरले. : इराणच्या वृत्तसंस्थेने सांगितले की, नौदल शाखेच्या विशेष दलांनी ही कारवाई केली. हेलिकॉप्टरचा वापर करून कमांडो जहाजावर उतरले. नंतर हे जहाज जप्त करण्यात आले. ब्रिटिश लष्कराच्या माहितीनुसार, आमिराती बंदर शहर फुजैराहजवळ ओमानच्या खाडीत ही घटना घडली.इराणने केलेल्या या कारवाईचा एक व्हिडीओ ‘असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेला मिळाला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने कमांडो जहाजावर छापेमारी करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. 

  • जहाजाचे मालक कोण?
  • प्राप्त माहितीनुसार, पोर्तुगीज ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाचे नाव ‘एमएससी एरिस’ असे असून लंडनस्थित ‘झोडियाक मेरिटाइम’ या कंपनीशी ते संबंधित आहे. ही इस्रायली अब्जाधीश आयल ऑफेर यांच्या मालकीच्या ‘झोडियाक समूहा’तील एक कंपनी आहे.
RELATED ARTICLES

जग अजून एका युध्दाच्या उंबरठ्यावर ! हल्ला अधिक आक्रमक करण्याचा इराणचा इशारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : एकीकडे रशिया-युक्रेन युद्धावर अद्याप पूर्णांशाने तोडगा सापडलेला नसताना जगासमोर आता आणखी एका युद्धाचं संकट आ वासून उभं...

सुरु झालं रे बाबा !फेसबूक-इन्स्टाग्राम युजर्सचा जीव भांड्यात, नेमकं काय घडलं होतं

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक, इन्स्टाग्रामसह मेटाच्या ठप्प झालेल्या सेवा आता सुरू झाल्या आहेत. फेसबूक आणि इन्स्टाग्राम...

कुस्तीपटू विनेश फोगाटची मोठी घोषणा ! मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करतेय

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!