Sunday, May 5, 2024
Home ताज्या बातम्या चोराच्या मनात चांदणे ! भाजपने लोकसभेत ‘चारशे पार’चे लक्ष्य संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच...

चोराच्या मनात चांदणे ! भाजपने लोकसभेत ‘चारशे पार’चे लक्ष्य संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच ठरवले आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशाच्या संविधानात धोरणात्मक बदल करण्यासाठी २/३ संख्याबळ अत्यावश्यक आहे.गेल्या दहा वर्षांमध्ये संविधान बदलण्यासाठी आवश्यक संख्या नसल्याने भाजपला संविधान बदलण्यासाठी अधिकार नव्हता. येत्या काही महिन्यात संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहे. शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी संविधान बदलण्याचा डाव रचून, यासाठी ‘अब की बार 400 पार’ हा नारा दिला असल्याने, आरक्षणवाद्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करावे, असे आवाहन करीत ‘चोराच्या मनात चांदणे’ अशी म्हण आहे.तेच अमित शहा यांच्या मनात आहे. संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच भाजपने लोकसभेत ‘चारशे पार’चे लक्ष्य ठेवले असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडीच्या कारवायांमध्ये शिक्षा कुणालाच झाली नाही. लोकशाहीऐवजी पोलिसी राज्य मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे २०१४ पासून १५ लाखाहून अधिक कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडले. राम मंदिराच्या उद्घाटनाच्यावेळी शंकराचार्यांचा सल्ला ऐकण्यात आला नाही. चारशे पारचा आकड्याची महत्त्वाकांक्षा व त्यातून संविधान बदलण्याचा विचार आदी कारणांमुळे २०१४ व २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळलेल्या मतदारांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ईडीच्या कारवायांमध्ये शिक्षा कुणालाच झाली नाही. उलट मोठ्या भ्रष्ट राजकारण्यांचा भाजपमध्ये प्रवेश करुन घेऊन चारशे पारचा आकड्याची जुळवाजुळव सुरू आहे.अति महत्त्वाकांक्षा व त्यातून संविधान बदलण्याचा विचार आणि वाढती महागाई, बेरोजगारी आर्थिक विषमता आदी कारणांमुळे २०१४ व २०१९ मध्ये भाजपकडे वळलेला आणि सध्याच्या नवीन मतदार व सवर्ण वर्ग यांचा संपूर्ण भ्रमनिरास झाला. त्याचा परिणाम म्हणजे मतदारांचा उत्साह कमी होऊन मतदानाची टक्केवारी कमी झाली.असेही अँड प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

शाहू, फुले, आंबेडकर व मानवतावाद स्वीकारणाऱ्या मतदारांवर आता मोठी जबाबदारी आहे. लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही करण्याचा प्रयत्न त्यांनी थांबवला पाहिजे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये मतदान न करता भाजपवर राग व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या विरोधात मत व्यक्त करून आपला रोष जाहीर करावा, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी केले. या टप्प्यामध्ये मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

लक्ष्या-महेशची जोडी पुन्हा दिसणार ! AI च्या माध्यमातून महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठी सिनेसृष्टीतील गाजलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी. या दोघांनी जेव्हा जेव्हा...

आता पर्यंत 42 टक्के मतदान ! बाळापूर विधानसभेत 45 टक्के तर अकोला पश्चिमेला 38 टक्के: आता 3 तास शिल्लक

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिलला पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा यवतमाळ-वाशिम आणि वर्धा...

डॉ.अभय पाटील मोठ्या मताधिक्यांनी निवडून येणार ! आता अकोला जिल्ह्यात खऱ्या विकासास प्रारंभ

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्यातील महाविकास आघाडीसाठी ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदारांचा सर्वत्र पाठिंबा मिळत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

अँड उज्ज्वल निकमांनी करकरेंना लागलेल्या गोळीचे सत्य न्यायालयापासून लपवलं ! वडेट्टीवार यांच विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती आणि आताचे भाजपाचे उत्तर मध्य मुंबईतील...

राष्ट्रीय पातळीवर श्री समर्थ कोचिंग क्लासेसचा नावलौकिक !जेईई मेन परिक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पश्चिम विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या मुलभूतरित्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर व ख्यातनाम अकोल्यातील श्री समर्थ कोचिंग क्लासेसच्या...

अकोल्यातील अल्पवयीन मुलीची धर्मांतरानंतर एक लाखांत राजस्थानात विक्री; आईसह टोळी जेरबंद

Akola crime:अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला येथील एका अल्पवयीन मुलीची धर्मांतर करून तिचा राजस्थानातील तरुणाशी यवतमाळात विवाह लावून देत एक लाख...

मोठी बातमी : लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अडकलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएसचे नेते एचडी रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास...

Recent Comments