Thursday, October 10, 2024
Homeराजकारणभाजपची चिंता वाढली ! मतदान वाढीसाठी नवा गेमप्लान ; आता प्रचारात 'हिंदू...

भाजपची चिंता वाढली ! मतदान वाढीसाठी नवा गेमप्लान ; आता प्रचारात ‘हिंदू मुस्लिम’ तृष्टीकरणाचा डाव

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात देशपातळीवर 2019 च्या तुलनेत तब्बल 3.11 टक्के कमी मतदान झाल्यानंतर, ‘विकसनशील भारत’ आणि ‘मोदी की गारंटी’ याऐवजी आता थेट हिंदू मुस्लिम तृष्टीकरणाची रणनीती आखण्यात आली आहे. सर्वंच प्रचारसभेत मुस्लिम तुष्टीकरणावर हल्ला चढविला जातो आहे. जेणेकरून हिंदू मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील, असं पंतप्रधान मोदी आणि चाणक्य अमित शाह यांना वाटते आहे. एवढेच नव्हे, तर पुढील पाच ही टप्प्यांसाठी वेगवेगळी रणनीती आखण्यात आली असून, मतदान आपल्याकडे वळवून घ्यायला विविध मुद्दे मांडले जाणार आहेत.असं विश्वसनीय सूत्रांनी माहिती देताना सांगितले आहे.

लोकसभा निवडणूकीचा बिगुलच ‘अब की बार, भाजप ३७० पार’ आणि एनडीए के साथ ४०० पार’ अशा घोषणांनी वाढविण्यात आला होता. यासोबतच ‘विकसनशील भारत’ आणि ‘मोदी की गारंटी’ देखील चिटकवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.पण मतदानाच्या पहिल्या टप्प्यात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातील पुर्व भागासह सर्वत्र मतदानाचा टक्का घसरला. दुस-या टप्प्यातही मतदान कमी झाले. पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे भाजपात चिंता वाढली आहे. निवडणूक आयोगाने अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 66.14 टक्के मतदान झाले. तर 2019 मध्ये 69.43 टक्के होते. म्हणजे 3.29 टक्क्यांहून कमी, तर दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाले. पण 2019 मध्ये 69.71 टक्के मतदान झाले होते. म्हणजे 2.93 टक्के कमी मतदान झाले. याप्रमाणे यंदा दोन टप्प्यात देशपातळीवर एकुण सरासरीपेक्षा 3.11टक्के मतदान कमी झाले आहे. कमी झालेल्या मतदानाने भाजपची मतांची टक्केवारी कमी झाल्याचे निष्पन्न होत असल्यानेच तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपने आपल्या एकुणच रणनीतीत बदल केला असल्याचे दिसून येते आहे. यंदा भाजपचा कोर वोटर निरुत्साही असल्याने टक्का घसरला आहे. याकरिता हा मतदार मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, म्हणूनच विकसनशील भारत दूर सारून, मंगळसूत्र आणि मुसलमान या दोनच ‘म’ च्या अवतीभवती प्रचार फिरत आहे.अशी चर्चा आहे.

वर्ष 2019 मध्ये जिंकलेल्या 303 जागांसाठी किमान 69 टक्के मतदान होणे आवश्यक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकूण मतांपैकी 38 टक्के मते मिळाली होती. तिसऱ्या टप्प्यातील बहुतांश जागा भाजपने यापूर्वी जिंकल्या जागा आहेत. ही बाब लक्षात घेता मतदान वाढवण्यासाठी भाजपने आपली संघटना सक्रिय केली आहे. बूथ कमिटीच्या सदस्यांना घरोघरी मतदानाच्या चिठ्ठ्या वाटण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी स्वतंत्र तयारी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे मतदानाबाबत निर्णय न घेतलेला मतदार म्हणजे फ्लोटिंग व्होटरला आकर्षित करण्यासाठी भाजपने रणनीतीत बदल केला आहे.या पार्श्वभूमीवर संघटनेच्या जोरावर तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढतो की नाही, हे पाहायचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सभांमध्ये ‘मोदी की गारंटी’ वर नाही, तर ते थेट मुस्लिमांवर टीका करणार आहेत.असं गत आठवड्यात आणि दोन दिवसांतील सभेतून स्पष्ट होते आहे.
■ भाजपचे इतर स्टार प्रचारक, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हेदेखील मुस्लिम तुष्टीकरणाच्या मुद्यावर विरोधी पक्ष काँग्रेस आणि इतर पक्षांवर थेट हल्ला करतील.
■ काँग्रेस लोकांकडून त्यांची संपत्ती, सोने, चांदी, मंगळसूत्र हिसकावून घेऊन रोहिंग्यांना आणि घुसखोरांना देईल, असे पंतप्रधानही आपल्या भाषणात सतत सांगत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!